सतत विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)

पीएमएवाय योजना काय आहे?

प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) हा भारत सरकारचा EWS लाभार्थ्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणारा एक उपक्रम आहे. पात्र अर्जदार योजनेच्या अटींच्या अधीन राहून ₹2.50 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी कृपया माहिती पुस्तिकेचा संदर्भ घ्यावा.

PMAY योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

अर्जदार पानावरील वरील बाजूस असलेल्या “येथे नोंदणी करा / लॉगिन करा” या बटणावर क्लिक करून ऑगस्ट २०२६ च्या सिडको गृहनिर्माण योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

सिडको घरांसाठी अर्ज करण्याचे पात्रता निकष काय आहेत?

पात्रतेच्या अटी ‘डाउनलोड्स / हेल्पडेस्क’ विभागामध्ये उपलब्ध असलेल्या ऑनलाइन माहिती पुस्तिकेमध्ये सविस्तरपणे दिलेल्या आहेत.

नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

आवश्यक कागदपत्रांची यादी सिडको होम्सच्या संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेत (डाउनलोड विभागांतर्गत उपलब्ध) किंवा आमच्याबद्दल विभागांतर्गत उपलब्ध आहे.

पसंतीचा पर्याय निवडण्याची विंडो कधी उघडेल?

ऑगस्ट २०२६ योजनेकरिता पसंतीक्रम (Preference Selection) नोंदवण्याची खिडकी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उघडेल. सिडको गृहनिर्माण योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया वर्षभर सुरू असते.

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असेल?

यानंतर पसंती क्रम निवडण्याची विंडो उघडेल, जिथे अर्जदार उपलब्ध घरांच्या यादीतून 15 पसंती देऊ शकतील. यानंतर अर्जदाराला बुकिंगची रक्कम भरावी लागेल, ज्यामुळे तो सोडतीसाठी पात्र ठरेल. घरांचे वाटप सिडको सोडतीद्वारे केले जाते. सविस्तर प्रक्रिया ‘डाऊनलोड्स’ (Downloads) विभागाअंतर्गत उपलब्ध असलेल्या माहिती पुस्तिकेत दिली आहे.

सिडको कोणत्या ठिकाणी आपले प्रकल्प जाहीर करत आहे?

ऑगस्ट २०२६ च्या योजनेअंतर्गत, सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) ४,७७९ घरांची घोषणा केली आहे; ज्यांची उपलब्धता तळोजा, कळंबोली आणि खारघर येथे आहे. याची सविस्तर माहिती आपण “सिडको प्रोजेक्ट्स” (CIDCO projects) या पृष्ठावर पाहू शकता.

“माझे पसंतीचे सिडको घर” म्हणजे काय?

ही एक विशेष संधी आहे, ज्याद्वारे सिडको इच्छूक खरेदीदारांना पसंतीक्रमाच्या कालावधीत (Preference Window) प्रकल्प, इमारत (Tower) आणि मजला निवडण्याची मुभा देते आणि लॉटरी प्रक्रियेद्वारे घरांचे वाटप केले जाते. सविस्तर माहितीसाठी, कृपया ‘डाउनलोड्स’ विभागांतर्गत उपलब्ध असलेली माहिती पुस्तिका पाहा.

विविध कार्पेट क्षेत्रांनुसार प्रत्येक घराची किंमत किती आहे?

किंमती स्थान आणि प्रकल्पानुसार बदलतात. सर्व घरांची किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा खूपच कमी आहे. तपशीलवार किमतींसाठी सिडको प्रकल्प विभागला भेट द्या

नॉन-EWS (बिगर-EWS) म्हणजे काय?

ज्यांचे एकूण कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹६ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा सर्व व्यक्ती नॉन-EWS (बिगर-EWS) प्रवर्गात मोडतात.

EWS म्हणजे काय?

EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. यामध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या अर्जदारांचा समावेश होतो. पात्रतेच्या संपूर्ण तपशिलासाठी, कृपया डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या माहिती पुस्तिकेचा संदर्भ घ्यावा.

EWS किंवा LIG प्रवर्गांतर्गत घरांमध्ये किती बेडरूम आहेत आणि त्यांचा आकार काय आहे?

सिडको 1 BHK आणि 2 BHK घरे देत आहे.
कार्पेट क्षेत्र:
● 1 BHK: 322 – 398 चौरस फूट.
● 2 BHK: 540 – 567 चौरस फूट.

सोडत (लॉटरी) कधी जाहीर होईल?

ऑगस्ट २०२६ योजनेची सोडत बुकिंगची मुदत संपल्यानंतर काढली जाईल. अर्जदारांनी सुरू असलेल्या योजनेशी संबंधित अद्ययावत माहितीसाठी सिडकोच्या संकेतस्थळाला (https://www.cidcohomes.com) नियमित अंतराने भेट द्यावी. याशिवाय, सर्व नोंदणीकृत अर्जदारांना सिडको ॲप आणि SMS द्वारे देखील सूचना पाठवल्या जातील.

मी लॉटरीसाठी कधीपर्यंत रजिस्टर करू शकतो?

सिडको गृहनिर्माण योजनेसाठी नोंदणी वर्षभर सुरू राहते.