सतत विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)
पीएमएवाय योजना काय आहे?
PMAY म्हणजेच प्रधान मंत्री आवास योजना ही आर्थिकदृष्ट्या कमकूवत घटकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली व्यापक मोहीम आहे. या योजनेचा उद्देश समाजातील आर्थिक निकषांवर पात्र ठरणाऱ्या दुर्बल घटकांना घरासाठी आर्थिक पाठबळ देणे हा आहे. पात्र व्यक्तींना २.५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
PMAY योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
अर्जदाराला सिडकोच्या www.cidcohomes.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल
सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी कोणते पात्रता निकष असतील?
पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी अर्जदार सिडकोच्या www.cidcohomes.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी योजना पुस्तिका पाहू शकतात.
नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
अर्जदार पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी ऑनलाईन नोंदणी योजना पुस्तिका पाहू शकतात
सोडत कधी जाहीर केली जाईल?
सोडती घोषणा लवकरच करण्यात येईल. यासंदर्भात अर्जदाराने सिडकोच्या संकेतस्थळाला (www.cidcohomes.com) नियमित भेट देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आम्ही CIDCO APP आणि एसएमएसद्वारेही अर्जदारांना सूचना पाठवणार आहोत. ऑनलाईन नोंदणीला १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरूवात होणार आहे
CIDCO HOME हे ॲप डाउनलोड करणे अनिवार्य आहे का?
नाही, सदर ॲप डाउनलोड करणे अर्जदाराला अनिवार्य नाही. तरी देखील आम्ही ॲप डाऊनलोड करा असे सुचवत आहोत. कारण अर्जदाराला योजनेशी संबंधित सगळी महत्त्वाची माहिती संकेतस्थळासह या ॲपवरही कळवण्यात येणार आहे
ऑनलाईन नोंदणीचे शुल्क किती आहे?
नोंदणी शुल्क रु. २३६/- (GSTसह) असून, ते विनापरतावा आहे.
या योजनेसाठी केलेल्या नोंदणीची वैधता किती काळासाठी असेल?
सिडको ६७००० घरांची सोडत जाहीर करत आहे. ग्राहकांना ही घरे टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहेत. अर्जदाराने केलेली सदर नोंदणी सिडकोची सदर महागृहनिर्माण योजना पूर्ण होईपर्यंत वैध असणार आहे.
मला प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वेळी २३६ रुपयांचे नोंदणी शुल्क भरून, पुन्हा पुन्हा नोंदणी करावी लागेल?
नाही, हे एकाच वेळेस भरावयाचे नोंदणी शुल्क आहे आणि ते सिडकोची ही महागृहनिर्माण योजना पूर्ण होईपर्यंत वैध असणार आहे.
नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रियेचे स्वरूप काय असेल?
अर्जदार नोंदणीकृत झाल्यानंतर, तो २६००० घरांच्या प्रकल्प स्थळांच्या यादींतील १५ स्थळे, टॉवर्स व मजल्यांसाठी आपली पसंती नोंदवू शकतो. यानंतर अर्जदाराला बुकिंगची रक्कम भरावी लागेल आणि सोडतीसाठी पात्रता सिद्ध करावी लागेल. या घराचे वाटप सिडकोच्या सोडतींच्या पद्धतीने होईल.
सिडकोने घोषणा केलेल्या या योजनेतील प्रकल्पांची स्थळे कोणती आहेत?
सिडको नवी मुंबईतील विविध ठिकाणी प्रकल्पांची घोषणा करणार आहे. एकूण ६७००० घरांपैकी पहिल्या टप्यात २६००० घरे उपलब्ध होणार आहेत. संबंधित स्थळांची माहिती सिडकोच्या www.cidcohomes.com या संकेतस्थळावर दिली आहे.
सिडकोच्या प्रत्येक प्रकल्पाचे RERA क्रमांक कोणते आहेत?
अर्जदार ही माहिती सिडकोच्या www.cidcohomes.com या संकेतस्थळावर पाहू शकतात
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा अल्प उत्पन्न गटांच्या घरांचे क्षेत्रफळ व शयनकक्षांची संख्या किती आहे
आस्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटा अंतर्गत देण्यात येणाऱ्या १ बीएचके सदनिकेचे महारेरा मान्य क्षेत्रफळ ३२२ चौ.फूट आहे. आणि अल्प उत्पन्न गटा अंतर्गत १ बीएचके सदनिकेचे आकारमान ३२२ चौ.फूट आणि ३९८ चौ.फूट असून २ बीएचके सदनिकेचे क्षेत्रफळ ५४० चौ.फू. आहे
“माझे पसंतीचे सिडकोचे घर” ही योजना काय आहे?
“माझे पसंतीचे सिडको घर” या सोडती अंतर्गत, सिडको इच्छुक अर्जदारांना पसंत असलेले प्रकल्प स्थळ, टॉवर्स आणि मजल्यांची संख्या निवडण्याची संधी देत आहे. प्रक्रियेच्या अधिक तपशीलासाठी, तुम्ही ऑनलाईन नोंदणी माहिती पुस्तिका पाहू शकता.
मी लॉटरीसाठी कधीपर्यंत नोंदणी करू शकतो?
इच्छुक अर्जदाराने लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची विंडो ३० दिवसांसाठी खुली असेल
विविध चटईक्षेत्राच्या प्रत्येक घराची किंमत किती आहे?
घरांच्या किंमती लवकरच जाहीर केल्या जातील व त्यांच्या किमती अन्य प्रकल्पांच्या तुलनेत नक्कीच कमी असतील याची आम्ही खात्री देतो