संकेतस्थळ, मोबाईल ॲप वापरासंबंधीच्या अटी
येथे नमूद केलेल्या अटी व शर्ती (‘टर्म’) हेलिओसमीडियम बाजार प्रा. लि. आणि थॉटरेन्स डिझाईन्स संयुक्त उपक्रम प्रा. लि. (सिडको, आम्ही, आमचे) सूचित (ऑफर) केलेल्या असून त्या संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन, API प्रणाली (अॅप्लिकेशन) यांच्या (एकत्रितपणे संकेतस्थळ) वापरावर लागू होतील.
कोणत्याही व्यक्तीने संकेतस्थळ (“क्लायंट”, “तुम्ही” किंवा “तुमचे”) ब्राउझिंग (शोधले), ऍक्सेस (भेट दिली) किंवा वापरले तरी, त्या व्यक्तीने कोणत्याही सेवांचा लाभ घेण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे किंवा संकेतस्थळावर (“सेवा”) प्रदान केले नाही, हे वाचले आहे असे मानले जाईल आणि त्या व्यक्तीने संकेतस्थळावरील अटी, शर्ती समजून घेतल्या आणि त्या बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे स्वीकारल्या, असे समजण्यात येईल. तसेच संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी त्यावेळी लागू धोरणांसह संकेतस्थळाचा वापरकर्ता (क्लायंट) आणि सिडको यांच्या
पात्रता
संकेतस्थळाच्या कोणत्याही कार्यप्रणालीत सहभागी होणे म्हणजे तुमच्याकडे त्यात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर क्षमता, अधिकार, हक्क, संमती आहे आणि तुम्हाला अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही सक्षम प्राधिकारी किंवा कोणत्याही न्यायिक/ न्यायालयीन संस्थेचे कसल्याही प्रकारचे कोणतेही बंधन नाही, याची हमी देता, असे समजले जाईल.
यासंदर्भात तुम्ही चुकीची/ खोटी माहिती सादर केली, तर तेव्हापासून, ती खोटी, चुकीची आहे, हे लक्षात आल्याच्या त्या क्षणापासून तुमच्या संकेतस्थळ, मोबाईल ॲप वापरावर निर्बंध घालण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला आहे.
अट
जोपर्यंत तुम्ही संकेतस्थळ किंवा आमच्या इतर सेवा कार्यरत असतील, तोवर या अटी आणि शर्ती लागू असतील. या अटी, शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ई मेलवर नोटीस किंवा एस एम एस (SMS) न पाठवता किंवा तुम्ही आमच्याकडे नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर थेट कॉल न करता संकेतस्थळ, मोबाईल ॲप्लिकेशन आणि इतर ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यापासून रोखण्याचा किंवा त्यापासून वंचित ठेवण्याचा अधिकार आमच्याकडे असेल.
या निर्बंधाना कालमर्यादेची, इशारा (अस्वीकरण) देण्याची, नुकसान भरपाई देण्याची किंवा अन्य कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेण्याची किंवा असे निर्बंध घातल्यानंतर तुमच्यावर होणाऱ्या परिणामांशी बांधील राहण्याची जबाबदारी आमच्यावर नसेल किंवा तशा प्रकारचे कोणतेही बंधन आमच्यावर नसेल.
संकेतस्थळावरील प्रकाशित साहित्याची मालकी
संकेतस्थळावर प्रकाशित साहित्याची, जसे की दृक श्राव्य माध्यमातील साहित्य, डिझाईन, छायाचित्रे, लोगो, नावे, लेख, जाहिराती, मजकूर, यासारख्या साहित्याची बौद्धिक मालकी सिडको आणि सिडकोने अधिकृतपणे नेमून दिलेल्या संस्थेकडे असेल.
संकेतस्थळावर प्रकाशित केलेली सामग्री किंवा साहित्य हे केवळ व्यक्तिगत वापरासाठी, उपयोगासाठी आहे. त्याचा कोणत्याही पोस्ट केलेली सामग्री केवळ तुमच्या वैयक्तिक वापरासाठी आहे. सिडको किंवा लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय या साहित्याचा किंवा सामग्रीचा व्यावसायिक वापर, उपयोग करता येणार नाही. त्याचा पुनर्वापर, संकलन, संपादन, प्रकाशन, वितरण, अंशत: संपादन किंवा वितरण, प्रसारण यासारख्या किंवा यापैकी कोणत्याही पद्धतीने करता येणार नाही.
तुमच्याकडून असे कोणतेही कृत्य किंवा प्रयत्न केलेले कृत्य कराराच्या अटींचे उल्लंघन समजून त्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा सिडकोला अधिकार असेल.
संकेतस्थळावर/ सिडको अॅपवर प्रसारित/ प्रकाशित (पोस्टबाबत) साहित्याबाबत…
संकेतस्थळावरील अटी आणि शर्ती यांचे उल्लंघन करणारे किंवा सिडको, संकेतस्थळ किंवा संकेतस्थळावरील लेखकाच्या अधिकाराचे हनन, बदनामी आणि त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे आक्षेपार्ह, बेकायदेशीर मजकूर हटवण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत,
संकेतस्थळावर तुम्ही अपलोड केलेल्या माहितीसाठी, त्या माहितीतील त्रुटी आणि सुधारणांसाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात, याची जाणीव ठेवूनच तशी माहिती, ई मेल पाठविताना काळजीपूर्वक अपलोड करावा किंवा पाठवावा. तुम्ही अपलोड केलेल्या माहितीतील अंशत: किंवा पूर्ण त्रुटींसाठी, त्यातील चुकांसाठी, किंवा तुम्ही अपलोड केलेल्या माहितीच्या नुकसानीसाठी व्यक्तिश: तुम्हीच जबाबदार आहात. त्यासाठी कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत बांधील नाही.
संकेतस्थळावर आणि ई मेलवरून तुम्ही दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून घेण्याचे सिडकोला अधिकार आहेत. हे अधिकार उपयोगात आणताना सिडको तुमच्याकडे कोणत्याही कागदपत्रांची मागणी करू शकते. जर तुम्ही समाधानकारक पुरावा देण्यात अपयशी ठरलात, तर तो अटी आणि शर्ती यांचे उल्लंघन समजून कुठल्याही प्रकारची भरपाई न देता तुमच्या संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपच्या वापरावर निर्बंध घालण्यात येतील.
संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅप वापरताना तुम्ही अपलोड केलेला मजकूर, प्रविष्ट केलेली माहिती ही एक अपरिवर्तनीय, शाश्वत, नॉन-एक्सक्लुझिव्ह, पूर्णपणे सशुल्क बाब आहे आणि ती वापरण्याचा, तिची पुनरावृत्ती (कॉपी) करण्याचा, त्यात सुधारणा, बदल करण्याचा, ती प्रकाशित, प्रसारित, वितरित करण्याचा, भाडे, भाडेपट्टी तत्वावर देण्याचा, जगभरात परवाना देण्याचा आम्हाला अधिकार आहे, हे तुम्ही मान्य करता आणि त्याची हमीही देता.
सिडको आणि संकेतस्थळाव्यतिरिक्त आलेल्या /येणाऱ्या मजकुराबद्दल…(Third Party Content & Links)
या संकेतस्थळाचा उपयोग करताना सिडको आणि संकेतस्थळ व्यतिरिक्त मजकुराच्या लिंक्स दिसू शकतात. या मजकुराच्या किंवा मजकुराच्या लिंक्सचा तुम्ही करत असलेला उपयोग त्या संकेतस्थळाच्या अटी आणि शर्ती, धोरणानुसार असेल.
अशा मजकुराच्या किंवा मजकुराच्या लिंक्सच्या विश्वासार्हता, त्यातील संदर्भाची, वैधता आणि उपयोगितेबद्दल आम्ही कसलीही जबाबदारी घेत नाही. आम्ही संकेतस्थळावर आलेल्या किंवा येणाऱ्या अशा लिंक्सची, त्यातील मजकुराची सत्यता पडताळण्याचा किंवा त्याची विश्वासार्हता तपासण्याचा प्रयत्न करत नाही.
अशा त्रयस्थ (थर्ड पार्टी) लिंक्सच्या उपयोगानंतर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानाला, हानीला व्यक्तीश: तुम्ही स्वत: जबाबदार असाल. त्याची आम्ही कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही आणि घेणारही नाही.
बेकायदेशीर आणि प्रतिबंधात्मक साहित्य
तुम्ही संकेतस्थळावर बेकायदेशीर किंवा बदनामीकारक साहित्य अपलोड, ईमेल, प्रसारित किंवा उपलब्ध करून दिल्यास, त्याचा आम्ही आमच्या पातळीवर तपास करु आणि योग्य कायदेशीर कारवाई करु. या कारवाईत तुम्हाला अनियमित कालावधीसाठी संकेतस्थळ आणि / किंवा सेवा वापरण्याचा तुमचा अधिकार संपुष्टात आणून तुम्ही सादर / अपलोड केलेले बेकायदेशीर आणि प्रतिबंधात्मक साहित्य काढून टाकणे याचाही समावेश आहे. ही कारवाई करताना तुम्हाला यांच्याकडून कोणत्याही प्रकारची आणि स्वरुपाची नुकसान भरपाई दिली जाणार नाही.
संकेतस्थळावर बेकायदेशीर किंवा प्रतिबंधित साहित्याच्या सूचीचे उदाहरण खालीलप्रमाणे:
- तुम्हाला कसलाही अधिकार नसताना दुसऱ्या व्यक्तीची माहिती, त्याचे साहित्य, माहिती अपलोड करणे,
- एखाद्याची वैयक्तिक, आर्थिक नुकसान करणारे, निंदनीय, बदनामीकारक, अश्लील, विकृत, दुसर्याच्या गोपनीयतेवर आक्रमण करणारे, द्वेषपूर्ण किंवा वांशिक, वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह, अपमानास्पद, मनी लॉन्डरिंग किंवा जुगार खेळण्याशी संबंधित किंवा प्रोत्साहन देणारे, किंवा इतर कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर साहित्य,
- अल्पवयीन मुलांच्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीला जबाबदार ठरणारे साहित्य,
- कोणत्याही पेटंट, ट्रेडमार्क, स्वामित्व कायदा (कॉपीराइट) किंवा इतर मालकी हक्कांचे उल्लंघन करणारे साहित्य,
- अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे साहित्य,
- ग्राहकाची फसवणूक किंवा दिशाभूल करणारी आक्षेपार्ह किंवा धोकादायक कोणतीही माहिती प्रसारित/ वितरित करणे,
- खोट्या/ बनावट नावाने (तोतयागिरी करत) माहिती देणे,
- सॉफ्टवेअर व्हायरस किंवा इतर कोणतेही संगणक कोड, कोणत्याही संगणक संसाधनाच्या कार्यप्रणालीत व्यत्यय आणण्यासाठी, ती नष्ट करण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी डिझाइन केलेल्या फाईल्स/ केलेला प्रोग्राम,
- भारताची एकता, अखंडता, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्व यांना धोका निर्माण करणारे, इतर देशांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे किंवा दखलपात्र गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणारे किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या चौकशी प्रक्रियेला बाधा आणणारे किंवा इतर राष्ट्राचा अपमान करणारे साहित्य,
अशा प्रकारचें साहित्य संकेतस्थळावर अपलोड करणे म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारच्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांना, नियमांना आव्हान देणे ठरते. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कायद्यांना, नियमांना सुसंगत ठरणारे साहित्य संकेतस्थळावर अपलोड करणे, ही तुमची जबाबदारी आहे.
तुम्ही सर्व लागू स्थानिक, राज्य आणि केंद्रीय कायदे, नियम आणि नियमांशी सुसंगतपणे संकेतस्थळ वापरणे आवश्यक आहे.
अस्वीकरण
संकेतस्थळावर उपलब्ध/ प्रकाशित साहित्याच्या माध्यमातून आम्ही सिडकोने देऊ केलेल्या कोणत्याही सेवांच्या संदर्भात कसलेही सल्ले देत नाही. संकेतस्थळावर उपलब्ध असलेले साहित्य/ माहिती अचूक, अद्ययावत असेल, याची आम्ही हमी देत नाही. आम्ही उपलब्ध करुन दिलेली माहिती/ साहित्य ‘ जशी उपलब्ध झाली तशी/ आहे त्या स्वरुपात’ आहे, याची तुम्हाला जाणीव आहे. उपलब्ध कायद्याच्या कक्षेत राहून आम्ही संकेतस्थळावरील माहितीची/ साहित्याची कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही.
मर्यादित दायित्व/ जबाबदारी
संकेतस्थळाचा उपयोग करताना, सिडकोने उपलब्ध करुन दिलेल्या सेवांचा लाभ घेताना तुम्हाला किंवा त्रयस्थ व्यक्तीला प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष स्वरुपात होणाऱ्या नफा नुकसानीला / फायदा तोट्याला सिडको, सिडकोचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, उपकंपन्या, सहयोगी संस्था, मध्यस्थ/ प्रतिनिधी आणि व्यावसायिक भागीदार जबाबदार असणार नाहीत. संकेतस्थळावरील माहिती, साहित्याचा उपयोग करताना अशा प्रकारचा धोका उद्भवू शकतो, याची सिडकोलाही जाणीव आहे.
म्हणूनच सिडको तुम्ही घेत असलेल्या सेवेसाठी आणि तुम्ही भरलेल्या रकमेपुरतीच मर्यादित जबाबदारी घेते.
नुकसान भरपाईबाबतचे धोरण
संकेतस्थळाचा उपयोग करताना किंवा सिडकोच्या सेवांचा/ योजनांचा लाभ घेताना कोणा त्रयस्थाने (थर्ड पार्टी) केलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासासाठी किंवा संकेतस्थळावर तुम्ही दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी तुम्ही सिडको, सिडकोचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, उपकंपन्या, सहयोगी संस्था, प्रतिनिधी, व्यावसायिक भागीदार यांच्यापैकी कोणालाही जबाबदार ठरवू शकत नाही. जर असे केल्याचे आढळून आले, तर ते अटी, शर्ती यांचे उल्लंघन समजून तुमच्यावर कारवाई केली जाईल.
गोपनीयता
संकेतस्थळ आणि आम्ही उपलब्ध करुन देत असलेल्या सेवांचा उपयोग या आमच्या गोपनीयतेच्या धोरणाला अनुसरून आहेत. याबाबतची सविस्तर माहिती गोपनीयता धोरण या लिंकमध्ये देण्यात आली आहे.
तक्रार निवारण अधिकारी
संकेतस्थळावरील मजकुराबाबत काही शंका, मतभेद किंवा वाद असतील किंवा आमच्या अटी, शर्तीचे उल्लंघन झाल्यास त्याची तक्रार निवारण अधिकारी तातडीने दखल घेईल. त्यासाठी ज्याची तक्रार असेल, त्याने खाली दिलेल्या तक्रारीसाठीच्या स्वतंत्र पोर्टलवर लेखी स्वरुपात तक्रार नोंदविणे आवश्यक आहे
श्री./श्रीमती ———————————- ,
पत्ता: सिडको —————- प्रायवेट लिमिटेड.
ईमेल : ——————————————–
मोबाईल क्रमांक: ————————————-
तक्रार निवारण पोर्टल: https://————————–.com/grievances/
मोबाईल कॉल/ SMS साठीची संमती
संकेतस्थळाला भेट दिलेले आणि सिडको देत असलेल्या सेवांसाठी अर्ज केलेले सिडको, त्याच्या उपकंपन्या, सहयोगी किंवा व्यावसायिक भागीदार यांच्याकडून ई मेल, एस एम एस (SMS), मोबाईल कॉल यासाठी तुमची संमती आहे, असे समजले जाईल. तुम्हाला पाठवलेले एस एम एस (SMS), फोन कॉल तुमचा मोबाईल नंबर DND यादीत असला तरी, टेलिफोन नियमन प्राधिकरणाच्या (TRAI) नियमांचे उल्लंघन मानले जाणार नाही.
अटी, शर्ती बदलण्याचा अधिकार
कोणत्याही कारणांमुळे संकेतस्थळ वापरासंबधीच्या अटी आणि शर्ती यामध्ये दर पंधरा दिवसांनी बदल करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला आहे. त्या अधिकाराचा वापर करत आम्ही कसलीही पूर्वसूचना न देता बदल, सुधारणा करु शकतो. बदल केलेल्या क्षणापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे वेळोवेळी अटी आणि शर्ती तपासून घ्याव्यात.
विशेष सूचना
संकेतस्थळावर दिलेल्या अटींपैकी कोणत्याही कारणाने जर एखादी अट न्यायालयीन संस्थेने अवाजवी, गैरलागू, बेकायदेशीर ठरवली, तर ती अट वगळून उर्वरित अटी, शर्ती यांचे पालन करणे बंधनकारक असेल.
सूट/ सवलत/ शिथिलता धोरण
संकेतस्थळ वापरासंदर्भातील किंवा सिडको योजनांच्या सेवांचा लाभ घेण्यासंदर्भातील अटी, शर्तीमधील कोणतीही तरतूद/ तरतुदी मागे घेतल्या जाऊ शकतात. पण त्यासाठी ती तरतूद किंवा त्या तरतुदी मागे घेतल्याचे सिडको किंवा तत्सम संस्थेने लेखी स्वरुपात जाहीर केल्यानंतरच तसे ग्राह्य धरण्यात येईल. जर असे घडले, तर ती तरतूद किंवा त्या तरतुदी वगळून अटी, शर्तीमधील उर्वरित तरतुदी अंमलात असतील.
व्याख्या (Interpretation)
अटी आणि शर्ती या सदरात वापरण्यात आलेल्या संज्ञा आणि शीर्षके ही केवळ संदर्भासाठी वापरण्यात आली आहेत. त्यांची वेगळी व्याख्या किंवा त्यांचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.
न्यायालयीन कक्षा आणि कायदा
संकेतस्थळ, मोबाईल ॲप आणि इतर ऑनलाइन सेवांच्या वापराबद्दलच्या अटी, मजकुराबाबतचे विवाद किंवा मतभेद यासंदर्भातील तक्रारींचे, दाव्यांचे भारतीय कायद्यानुसार आणि केवळ नवी मुंबई न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातच निराकरण केले जाईल.