गोपनीयता धोरण

गोपनीयता धोरण

हे गोपनीयता धोरण (“धोरण”) तुम्ही https://cidcohomes.com या संकेतस्थळाच्या / ‘सिडको होम्स‘ या
संकेतस्थळाच्या / CIDCOHOMES App ('सिडको होम्स‘) या मोबाईलअॅप आणि इतर सेवांच्या तुमच्या वापरावर लागू होते, मात्र संकेतस्थळावर येणाऱ्या बाह्य लिंक्स (External Links) संदर्भात हे धोरण लागू होत नाही.

संकेतस्थळाचा/मोबाईल अॅपचा उपयोग केल्या क्षणापासून तुम्ही या गोपनीय धोरणाशी बांधील आहात, असेच समजले जाईल. त्यामुळे इथे तुमच्याकडून उपलब्ध करून दिलेली माहिती संकलित करुन तिचा इतरत्र उपयोग, वितरण केले जाऊ शकते, याची तुम्हाला जाणीव असणार, असे मानण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्याचे अधिकार सिडको आणि असतील.

इथे दिलेल्या अटी या संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप वापराशी संबंधित आहेत आणि त्याच संदर्भाने या गोपनीयता धोरणाकडे पाहिले गेले पाहिजे.

आम्ही संकलित करत असलेल्या माहितीबद्दल..

तुम्ही आमच्या संकेतस्थळाचा, मोबाईल ॲपचा वापर करत असताना आम्ही विविध मार्गाने आम्ही तुमची वैयक्तिक माहिती संकलित, संग्रहित करु शकतो. उदाहरणादाखल जर तुम्हाला सिडको किंवा सिडकोशी संबंधित माहिती (न्यूज लेटर) हवी असेल, तर त्यासाठी आम्ही तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ई मेल आयडी आणि यासारखी वैयक्तिक माहिती विचारु शकतो. ती उपलब्ध करुन दिल्यानंतरच तुम्हाला अशा सेवांचा लाभ घेता येणार आहे.

तुम्हाला ओळखण्यासाठी, तुमच्याशी सहजपणे संपर्क साधण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती म्हणजेच तुमचे संपूर्ण नाव, राहण्याचा/ संपर्काचा पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, दूरध्वनी क्रमांक हे तपशील ‘वैयक्तिक माहिती’ या संज्ञेच्या कक्षेत येतात.

या वैयक्तिक माहितीशिवाय तुमच्या संदर्भातील इतर माहिती यात तुम्ही संकेतस्थळाला, मोबाईल ॲपला भेट दिल्यानंतर तुमची वेब हिस्ट्री म्हणजेच तुम्ही कोणकोणत्या संकेतस्थळांना भेट डेटा, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुम्ही काय आणि कोणत्या स्वरुपाचे साहित्य/ मजकूर शोधता, तुमचा आय पी ॲड्रेस, तुमचे लोकेशन यासारख्या गोष्टींची माहिती संकलित केली जाऊ शकते.

या माहितीचा संबंधित सेवांचे प्रमोशन करण्यासाठी, त्याबाबतची अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे, ही माहिती द्यायची की नाही, हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जर तुम्ही या अधिकाराचा उपयोग करत संबंधित माहिती सादर केली नाही, तर आम्हीही
तुम्हाला ठराविक सेवेपर्यंतच संकेतस्थळाचा उपयोग करु देऊ शकतो.

 

माहितीचा उपयोग.

न्यूज लेटर, सिडको सेवांसंदर्भातील ऑफर्स, फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी/ खबरदारी, सिडको राबवत असलेल्या योजनांची, प्रकल्पांची माहिती, सिडको सेवांच्या अनुषंगाने असलेल्या स्पर्धा, सर्वेक्षण, सिडको सेवांबाबतचे इतरांचे आणि तुमचे अनुभव, त्रुटी, सुधारणा यासारख्या माहितीची देवाणघेवाण करताना ती तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही, याची खात्री करुन घेण्यासाठी या संकलनाचा उपयोग होणार आहे. या व्यतिरिक्त कोणा अन्य कारणांसाठी माहिती संकलित केली जात असेल, त्याची पूर्वकल्पना देऊन तुमच्या सहमतीनेच ती संकलित केली जाईल.

कुकीज ( तत्कालिन सुधारणांची माहिती)

संकेतस्थळाची, मोबाईल ॲपचा वापर करताना तो अधिक सुलभ आणि वेगाने होण्यासाठी त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. त्याची माहिती देणाऱ्या कुकीज (म्हणजेच त्या त्या वेळी केलेल्या सुधारणांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचे माध्यम) पाठवल्या जातील. यासाठी आम्ही थर्ड पार्टी टूल वापरत असतो. त्यामुळे या कुकीजचा वापर करुन सिडको किंवा आमच्याशी संबंधित नसणारेही तुमची वैयक्तिक माहिती संकलित करु शकतात. त्यामुळे या कुकीजचा उपयोग करायचा की नाही, याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे.
(कुकीजच्या माध्यमातून आमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या माहितीचे संकलन केले जात नाही. मात्र या कुकीजवरुन दिलेल्या सूचना, माहितीचा वापर टाळला गेला, तर तुम्हाला संकेतस्थळावरील काही गोष्टींचा अंशतः किंवा पूर्णतः फायदा मिळणार नाही.) त्यामुळे थर्ड पार्टी ने विचारलेली माहिती न देण्याचे टाळून
तुम्ही या कुकीजचा उपयोग करु शकता.

माहितीचा उपयोग

संकेतस्थळ, ई मेल, मोबाईल ॲपच्या माध्यमातून संकलित केलेल्या माहितीचा पुढीलप्रमाणे उपयोग, वितरण होऊ शकतो.

  • सिडकोच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या उपकंपन्या, सहयोगी संस्था, सिडकोच्या भागीदार संस्था यांच्या कामकाजासाठी
  • आमच्यासोबत कायदेशीर करारपत्र केलेल्या व्यावसायिक संस्था, जाहिरातदार, कंत्राटदार, सेवा पुरवणाऱ्या संस्था. याच्याकडे तुमची वैयक्तिक माहिती देताना ती आम्ही सांगू, त्याच कारणांसाठी वापरण्याची अट घालून
  • तुम्ही ज्या कारणांसाठी माहिती दिली आहे, त्याच्या पूर्ततेसाठी
  • आमची ध्येय – धोरणे अंमलात आणण्यासाठी किंवा राबवण्यासाठी
  • संशयित अवैध, बेकायदेशीर कृत्यांना पायबंद घालण्यासाठी, कारवाई करण्यासाठी
  • सर्च वॉरंट, सूचना, उपसूचना देणे, न्यायालयीन आदेश बजावणेयासारख्या कायदेशीर प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी
  • ग्राहक, सहयोगी संस्था यांच्या हिताचे आणि सार्वजनिक ठिकाणच्या आमच्या मालमत्तेचे, अधिकारांचे रक्षण करण्यासाठी
  • तुमच्याकडून माहिती घेताना आम्ही सांगितलेल्या त्या त्या वेळच्या कारणांसाठी.

सुरक्षितता

तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि गोपनीयता यासाठी आम्ही पावलोपावली खबरदारी घेतली आहे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी प्रशासकीय आणि स्वचलित (इलेक्ट्रॉनिक) सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत.

तुमच्या वैयक्तिक माहितीचे संकलन आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही एनक्रिप्शन ( end to end user privacy) सह सर्व प्रचलित मानके पाळतो. तुम्हाला अपेक्षित असलेली सेवा तुम्हाला मिळेपर्यंत आणि त्यानंतर कायदेशीर आणि सेवा संदर्भातील कामासाठी आम्ही तुमची वैयक्तिक माहिती संग्रहित करुन ठेवतो. हा कालावधी कायद्याने निर्धारित केलेला, कायदेशीर कराराच्या अंमलबजावणी, दावे/ खटले सुरु असेपर्यंतचा असू शकतो.

संकेतस्थळ, मोबाईल ॲपचा बिनदिक्कत उपयोग करता यावा आणि तुमच्याकडून आम्ही संकलित केलेल्या माहितीचा गैरवापर टाळता यावा, यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. तरीही आम्ही केलेल्या सुरक्षा
उपाययोजना भेदून (संकेतस्थळ हॅक करुन) त्रयस्थ/ तिऱ्हाईत व्यक्ती / संस्थांकडून उपलब्ध करुन घेतली जाऊ शकते. त्यामुळे संकेतस्थळावर अपलोड केलेल्या माहितीची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरच असणार आहे. अशा
परिस्थितीत तुमच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता भंग झाली, तर आम्ही कायदेशीरदृष्ट्या कसलीही जबाबदारी घेण्यास, नुकसान भरपाई देण्यास बांधील असणार नाही. वैयक्तिक माहितीची गोपनीयता भंग झाली, तर आम्ही कायदेशीरदृष्ट्या कसलीही जबाबदारी घेण्यास, नुकसान भरपाई देण्यास बांधील असणार नाही.

गोपनीयता धोरणातील अटी आणि सुधारणा

कुठलीही पूर्वसूचना न देता आमच्या गोपनीयतेच्या धोरणातील अटींमध्ये बदल/ सुधारणा/ शिथिल/ नव्याने समावेश केला जाऊ शकतो. त्याची माहिती करुन घेण्यासाठी अधूनमधून गोपनीयतेचे धोरण तपासून घ्या. संकेतस्थळाचा उपयोग करताना गोपनीयतेचे धोरण तपासणे, त्यातील बदल समजून घेणे, ही तुमची जबाबदारी आहे, हे तुम्हाला मान्य आहे, असेच गृहीत धरले जाईल.

अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या कक्षेत

संकेतस्थळ, मोबाईल ॲप यांचा वापर करु द्यायचा की नाही, हे केवळ भारतीय कायद्यानुसार आणि भारतीय कायद्यांचाच अर्थ लावून ठरवले, नियंत्रित केले जाईल. यासंदर्भातील दावे, खटले फक्त आणि फक्त नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सक्षम न्यायालये/ लवाद यांच्याकडेच सादर करता येतील.

तक्रार आणि निवारण

सिडको सेवांसंदर्भातील तक्रारींचे, वादांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण अधिकाऱ्याची / नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्याच्याकडे लेखी तक्रार करुन संबंधित तक्रारीचे निराकरण करुन घेता येईल.

 

श्री/श्रीमती.—————————————
पत्ता:——————————————–
ईमेल: ———————————————
मोबाईल / फोन नंबर: —————————–
तक्रार नोंदविण्यासाठीचे पोर्टल: https://——————————–
.com/grievances/